एमएसएमईच्या वाढ आणि विकासाची व्याप्ती विषयावर कणकवलीत राष्ट्रीय चर्चासत्रसह प्रदर्शन

केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांच्या हस्ते 19 फेब्रुवारी रोजी उद्घाटन..

⚡कणकवली ता.१६-: एमएसएमई मंत्रालय, भारत सरकार उद्योजकता रोजगार आणि उपजीविकेच्या संधींच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना राबवत आहे, सदरहू मंत्रालय एमएसएमईसाठी केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय चर्चासत्र सह-प्रदर्शनाचे आयोजन करत आहे. एमएसएमईच्या वाढ आणि विकासाची व्याप्ती या विषयावर कणकवली येथे 19 ते 21 फेब्रुवारी 2023 दरम्यान याचे भव्य आयोजन केले आहे.
या कार्यक्रमादरम्यान मंत्रालयाच्या विविध योजना आणि भारत सरकारचे उपक्रम जसे की आत्मनिर्भर भारत पॅकेज, उद्यम नोंदणी, एमएसएमई शाश्वत झेईडी
प्रमाणपत्र योजना, एमएसएमई नाविन्यपूर्ण योजना (इन्क्युबेशन, डिझाइन आणि आयपीआर
आणि राष्ट्रीय एससी एसटी
हब, एसआरआय फंड इत्यादी विद्यमान आणि संभाव्य उद्योजकांसोबत सामायिक केल्या जातील. यामध्ये सरकारी संस्था, प्रख्यात उद्योग संघटना, विद्यमान आणि इच्छुक उद्योजकांचा सहभाग अपेक्षित आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांच्या हस्ते 19 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. कार्यक्रमाचे ठिकाण उपजिल्हा रुग्णालया समोरील मैदान, कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग येथे आहे. यावेळी श्री , एमएसएमई मंत्रालय, भारत सरकार.सचिव बी.बी.स्वैन,कॉयर बोर्डअध्यक्ष श्री डी कुप्पुरम,श्री मनोज कुमार, अतिरिक्त सचिव आणि विकास आयुक्त डॉ. रजनीश, श्रीमती मर्सी इपाओ, श्रीमती मोनिका बहल, सीईओ ब्युटी अँड वेलनेस सेक्टर स्किल कौन्सिल नवी दिल्ली, श्री. विनित कुमार, सीईओ, केव्हीआयसी आणि इतर प्रमुख व्यक्ती सहभागी होत आहेत आणि सहभागीना एमएसएमईचा विकास आणि प्रसाराच्या दृष्टीने आवश्यक प्रेरणा निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमात पीएमईजीपी आणि ग्रामोद्योग लाभार्थ्यांसाठी 19 ते 21 फेब्रुवारी 3 दिवसांचे प्रदर्शन, 18 ते 20 फेब्रुवारी 18 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत कॉयर उत्पादनांवर 3 दिवसांचे प्रदर्शन आणि 19 ते 20 फेब्रुवारी 2023 रोजी प्रदर्शनासह 2 दिवसांचा विक्रेता विकास कार्यक्रम असेल.

You cannot copy content of this page