ऐनारी येथे महाशिवरात्री निमित्त १७ रोजी अखंड हरिनाम सप्ताह

*वैभववाडी संजय शेळके

 ऐनारी येथे महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवार दि. १७ फेब्रुवारी पासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
 कार्यक्रमाची रुपरेषा पुढीलप्रमाणे- शुक्रवार दि. १७ रोजी सकाळी ९ ते १०.३० वा. श्री देव गांगेश्वर व श्री देव रवळनाथ ब्राम्हण करवी अभिषेक विधीवत पूजा, सकाळी १०.३० ते ११.३० वा. शास्त्रोक्त विधीवत घटस्थापना, विणा पूजन, पंचपदी भजन, सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० वा. शिवलिलामृत ग्रंथ सामुहिक पारायण प्रारंभ, दुपारी १२.३० ते १.३० वा. महाप्रसाद, सायंकाळी ५ ते ६ वा. हरिपाठ, सायंकाळी ६ ते रात्री ८.४५ वा. संत निरंकारी आध्यात्मिक सत्संग, ब्राःच वैभववाडी सेवा परम पूज्य महात्मा विश्वासराव भोसले, सातारा, रात्री ८.४५ ते १०. वा. महाप्रसाद, रात्री ९ ते ११ वा. सुमधुर कीर्तन ह, भ. प. श्री. दौलत महाराज पाटेकर, कोळंब राजापूर
 शनिवार दि. १८ रोजी सकाळी ६ ते ८ वा. श्री देव गांगेश्वर व श्री देव रवळनाथ यांची काकडा व आरती, सकाळी ८ ते ९ वा. ब्राम्हण करवी अभिषेक व विधीवत पूजा, सकाळी ९ ते ११ वा. शिवलिलामृत ग्रंथ सामुहिक पारायण, दुपारी ११ ते १ वा. महिला भगिनींसाठी हळदी कुंकू समारंभ, दुपारी १ ते २ वा. महानैवेद्य उपवासाचा महाप्रसाद, दुपारी ३ ते सायंकाळी ६.वा. होम हवन व लघुरुद्र(श्री क्षेत्र दक्षिण काशी कोल्हापूरचे ऋग्वेदी ब्राम्हण श्री नारायण जोशी व इतर ब्रम्हवृंद यांच्या हस्ते, सायंकाळी ७ ते ८ वा. हरिपाठ ह. भ. प. श्री संदिप महाराज सकपाळ(मुंबई) व सहकारी, रात्री ८ ते ९. वा. उपवासाचा महाप्रसाद, रात्री ९ ते ११ वा. सुमधुर कीर्तन ह. भ. प. श्री. तुकाराम महाराज गावडे(माणगाव)
 रविवार दि, १९ रोजी सकाळी ७ ते ८. वा. ब्राम्हण करवी अभिषेक व विधीवत पूजा, सकाळी ८ ते ९ वा. शिवलिलामृत ग्रंथाची सांगता समारंभ, सकाळी ९ ते ११ वा. काल्याचे किर्तन ह. भ. प. श्री. तुकाराम महाराज गावडे(माणगाव), सकाळी ११ ते दुपारी १२.३० वा. दिंडी व पालखी सोहळा, दुपारी १२.३० वा. ते १.३० वा. स्वागत समारंभ व सेवेकरी देणगीदार सन्मान, दुपारी १.३० ते ३. वा. महाप्रसाद व समारंभ सांगता. आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविकांनी अखंड हरिनाम सप्ताहाचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्री देव गांगेश्वर विश्वस्त व्यवस्था ऐनारी मंडळाचे अध्यक्ष दशरथ गुरव, उपाध्यक्ष मंगेश गुरव, सचिव सुर्यकांत गुरव, उपसचिव सत्यजीत गुरव, खजिनदार अनंत गुरव, उपखजिनदार प्रकाश गुरव यांनी केले आहे.
You cannot copy content of this page