⚡सावंतवाडी ता.१५-: भटवाडी येथील नीळकंठ मेस्त्री कुंटूबांला सामाजिक कार्यकर्ता सौ.निलिमा चलवाडी यांनी जीवनावश्यक वस्तूंची मदत केली.सौ. मेस्त्री यांच्यावर अलीकडेच शस्त्रक्रिया झाली असून त्यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे,याचेच समाजिक भान राखून सौ. चलवाडी यांनी त्यांना कडधान्य व जीवनावश्यक वस्तूंची मदत केली.
यावेळी भारती परब,सुप्रिया दमानकर,सिमा सोनटक्के आदी उपस्थित होत्या. सौ.चलवाडी यांनी केलेल्या मदतीबद्दल मेस्त्री कुटुंबांनी ॠण व्यक्त केले.
