सैनिक पतसंस्थेचे अध्यक्षपदी बाबुराव कविटकर यांची बिनविरोध निवड…

▪️तर उपाध्यक्षपदी चंद्रकांत शिरसाठ यांची निवड. संस्थापक अध्यक्ष पिटर डान्स यांनी केली अभिनंदन…

⚡सावंतवाडी ता.१४-: सिंधुदुर्ग जिल्हयात अग्रगण्य असलेली सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणुक नुकतीच पार पडली. अध्यक्षपदी बाबुराव कविटकर व उपाध्यक्षपदी चंद्रकांत शिरसाठ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सभेच्या सुरवातीस पुलवामा हल्ल्यातील शहिद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. सदर संस्थेच्या सर्व सभासदांनी एकोप्याचे दर्शन घडवत निवडणुक बिनविरोध करण्याच्या दृष्टिने एक चांगला धोरणात्मक निर्णय घेतला. अध्यासी अधिकारी श्री. अनिल क्षिरसागर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेलया सभेत चेअरमन पदी श्री. बाबुराव अर्जुन कविटकर व व्हा.चेअरमन पदी श्री. चंद्रकांत दाजी शिरसाट यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीबद्दल सस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. पिटर फ्रान्सिस डान्टस यांनी नुतन पदाधिका-यांचे अभिनंदन केले.

यावेळी अध्यासी अधिकारी श्री. अनिल क्षिरसागर, सहकार खात्याचे अधिकारी श्री. राजन आरावंदेकर व संस्थेचे नुतन संचालक श्री. दिनानाथ लक्ष्मण सावंत, श्री. हिंदबाळ भगवान केळुसकर, श्री. सुभाष कुडाजी सावंत, श्री. भिवा बाबाजी गावडे, श्री. चंद्रशेखर शिवराम जोशी, श्री. शामसुंदर पांडुरंग सावंत, श्री. संतोष वसंत मुसळे, श्री. बाबु शिदु वरक, श्री. शांताराम जयराम पवार व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुनिल बाबु राऊळ उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे अधिकारी व कर्मचा-यांनी पदाधिका-यांचे अभिनंदन केले.

You cannot copy content of this page