⚡बांदा ता.१४-: आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल, आरोस मधून शासकीय रेखाकला परीक्षा 2022साठी एलिमेटरीसाठी 19 मुले प्रविष्ठ झाली होती. सर्व मुले उत्तीर्ण होऊन शंभर टक्के निकाल लागला. ए श्रेणीत 8 मुले, बी श्रेणीत 11 मुलांनी सहभाग घेतला.
इंटरमिजीएटसाठी 13 मुले प्रविष्ठ झाली होती असून सर्व उत्तीर्ण झाल्याने शंभर टक्के निकाल लागला. ए श्रेणीत 1, बी श्रेणीत 5 व सी श्रेणीत 7 मुलांनी यश प्राप्त केले. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष राहिदास सावंत, उपाध्यक्ष बाळा परब, सचिव राजन नाईक, मुख्याध्यापक विद्याधर देसाई, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
