तेजस्वी अबँकसच्या मुलांचे राष्ट्रीय परीक्षेत यश

वेंगुर्ला प्रतिनिधी- प्रोऍक्टिव्ह अबॅकस आयोजित राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत तेजस्वी अबॅकसच्या मुलांनी सुयश प्राप्त केले. विजेते ठरलेल्या व स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना १२ फेब्रुवारी रोजी गौरविण्यात आले.
यामध्ये तेजस्वी अबॅकसच्या आराध्य उगवेकर, अस्मि कांबळी, श्रेयस सावंत, शर्व आपटे, वरदा परब, आर्यन मोचेमाडकर, स्वरूप आरोलकर, वैष्णवी कर्पे, ओम केरकर, ऐश्वर्या परब, श्रावणी शिरोडकर, सान्वी तेंडुलकर, सर्वेश साळगावकर, यथार्थ सूर्याजी, आराध्य पोळजी, प्रांजल माडकर यांचा समावेश आहे. २९ मुले सुवर्णपदकाची मानकरी ठरली. या स्पर्धेची दुसरी फेरी ही राष्ट्रीय स्तरावरील असून यामध्ये तेजस्वी अबॅकसतर्फे दोन विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातील शर्व आपटे या मुलाने ९२ गुण तर श्रेयांस सावंत या मुलाने ८० गुण मिळवत आपल्या गटात देशातून दहावा क्रमांक मिळवला.
साई मंगल कार्यालयात पार पडलेल्या विद्यार्थी गौरव कार्यक्रमावेळी माजी नगरसेवक अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, पाटकर हायस्कूलच्या शिक्षिका सविता जाधव, शिरोडा येथील प्रसिद्ध उद्योजक पराग शिरोडकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page