विद्या विहार इंग्लिश स्कूलचा
स्नेहमेळावा उत्साहात संपन्न …

⚡बांदा ता.१४-: विद्या विहार इंग्लिश स्कूल आरोस प्रशाळेच्या सन १९८९-९० च्या दहावीच्या वर्गाचा स्नेहमेळावा उत्साहात व विविध कार्यक्रमानी संपन्न झाले.
यानिमित्ताने तब्बल ३१ वर्षानंतर वर्गातील सवंगडी एकत्र आले होते. स्नेहमेळाव्याला वर्गातील १९ जण उपस्थित होते. यावेळी जयश्री आरोसकर, दिपाली मालवणकर, भारती मालवणकर, संध्या नाईक, शंकुतला पागंम, मिनाक्षी आरोलकर, राजन मालवणकर, राजन परब, समिर वेंगुर्लेकर, चंद्रकांत सातार्डेकर, चंद्रकांत दाभोलकर, अरुण दाभोलकर, एकनाथ नाईक, सत्यवान नाईक, प्रवीण मेस्त्री, अनिल नाईक, सतिश मोरजकर, प्रकाश गावडे, बाबुराव नाईक यांनी मनोगत व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. माजी मुख्याध्यापक शांताराम गावडे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत त्यांची विचारपूस केली. यावेळी प्रशालेत विविध कार्यक्रम संपन्न झालेत.

You cannot copy content of this page