⚡कणकवली ता.०५-: सिंधूरत्न योजनेचे सचालक उद्योजक किरण उर्फ़ भैय्याशेठ सामंत याच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवेसेना पक्षाच्यावतीने 7 जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
7 जानेवारी रोजी देवगड़ कुणकेश्वर मदिरामधे लघुरूद्र व महाप्रसाद,वैभववाड़ी दत्तमदिर येथे अभिषेक व फळवाटप,कणकवली ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रमध्ये फळवाटप,कणकवली राममंदिर येथे लघुरूद्र व महाप्रसाद , फोडाघाट येथे खेळ पैठनीचा होम मिनिस्टर स्पर्धा,आचरा येथे मेडिकल कॅम्प, आचरा रामेश्वर मदिरामध्ये लघुरूद्र व अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मठामध्ये लघुरूद्र, मालवण येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये फळवाटप व खाऊवाटप,सविताश्रम, आनद आश्रम, गिरिजा आश्रम असलदे येथे धान्यवाटप,कुडाळमध्ये कुडाळेश्वर मदिरामध्ये अभिषेक, कातकरी, मागास, आदिवासी वस्तीमधे खाऊवाटप व धान्यवाटप
नाग्या महादू शाळेमध्ये खाऊवाटप
असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
या सर्व कार्यक्रमा मध्ये विविध पक्षातील कार्यकर्ते बाळासाहेबाची शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत.
या सर्व कार्यक्रमास बाळासाहेबांची शिवसेनेच्या जास्तीत जास्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख संजय आग्रे, उपजिल्हाप्रमुख महेद्र सावंत, तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, भास्कर राणे, महेश तेली, नीलेश तेली यांनी केले आहे
