चिवलां बीच स्मशान शेड लोखंडी पारई उपलब्ध

ठाकरे गटाच्या जावकर, खोत यांनी केला होता पाठपुरावा

मालवण : (प्रतिनिधी)

मालवण शहरातील चिवला बीच स्मशानभूमीत शवदाहिनीच्या लोखंडी पारई मागील वर्षभर खराब झाल्या होत्या. याबाबत शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर, माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे या पारई उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गुरुवारी या पारई येथे बसवण्यात आल्या. या कामी खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांचे सहकार्य लाभले, अशी माहिती श्री. जावकर यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page