मालवण शहर प्रवेश द्वारावरील खड्ड्यांमुळे होत आहेत अपघात

दीपक पाटकर, ललित चव्हाण यांनी वेधले पालकमंत्री चव्हाण, निलेश राणे यांचे लक्ष

मालवण (प्रतिनिधी)

मालवण शहराच्या प्रवेशद्वारावर रस्त्यालगतच पडलेल्या भला मोठ्या खड्ड्यामुळे वाहनांचे अपघात घडत असल्याचे निदर्शनास येताच माजी नगरसेवक दीपक पाटकर, भाजयुमोचे ललित चव्हाण यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार नीलेश राणेंचे लक्ष वेधले. त्यांनी सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्यानंतर बांधकामच्या अधिकाऱ्यांनी आंगणेवाडी यात्रेपूर्वी हे काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.

मालवण शहराच्या प्रवेशद्वाराजवळच्या रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे आठवडा बाजाराच्या दिवशी अनेक अपघात घडले आहेत तर अनेक जण त्या खड्ड्यामुळे अपघात होता होता वाचले असल्याची घटना अलीकडेच घडली होती. ही बाब माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ त्या ठिकाणी भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष ललित चव्हाण, सचिन हडकर, शुभम लुडबे, रमाकांत फाटक, दुर्गेश गावकर, बाबू वायंगणकर, निनाद बादेकर, राजा मांजरेकर, मुन्ना फाटक, श्रीराज बादेकर, राजू बिडये, महेश सारंग यांना सोबत घेऊन पाहणी केली. हा खड्डा तत्काळ बुजविणे आवश्यक असल्याने त्यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांच्याशी संपर्क साधून लक्ष वेधले. त्यानुसार हे काम आंगणेवाडी यात्रेपूर्वी करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी हे काम लगेच सुरू करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

You cannot copy content of this page