सरत्या वर्षात नील बांदेकरवर बक्षिसांची खैरात

⚡बांदा ता.०४-: : केंद्र शाळा बांदा नं. १ चा इयत्ता चौथीत शिकणारा विद्यार्थी कु. नील नितीन बांदेकर याने वर्षाअखेरीस अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होऊन बक्षिसे पटकावली आहेत. नीलने आतापर्यंत सुमारे १२१ एवढी बक्षीसे मिळविली आहेत.

यात दोडामार्ग आयोजित राज्यस्तरीय वेशभूषा स्पर्धेत तो प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला.
सोनी मराठीच्या मालिकेसोबत एका महानाट्यासाठी तसेच मुंबई मेड वेबसिरीज साठी संधी चालून आली आहे. फ्लोरिडा अमेरिका आयोजित चित्रकला स्पर्धेतही तो अव्वल ठरला. ज्ञानी मी होणार या स्पर्धेत नील, केंद्र आणि बिट मध्ये साहील कोळापटे या जोडीदारासोबत प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. डॉट कॉम आयोजित वाचन स्पर्धेतही तो राज्यात प्रथम आला आहे. चित्रकला, रंगभरण, गायन, कथाकथन, वक्तृत्व, मॉडेलिंग, निबंध, हस्ताक्षर यात त्याचा हातखंडा आहे. त्याच्या या यशात त्याला बांदा केंद्र शाळेचे शिक्षक,आई वडील, तसेच शाळा व्यवस्थापन समिती यांचे मार्गदर्शन लाभले . नीलवर विविध स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

You cannot copy content of this page