बाल संसद, बाल साहित्य संमेलनाचे पुढील वर्षापासून आयोजन

प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश म्हात्रे

⚡सावंतवाडी ता.०४-: शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जाते तसेच पुढच्या वर्षी पासून कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून बाल साहित्य संमेलन,बाल संसद आयोजन करण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभाग निश्चितच पुढाकार घेईल असा विश्वास प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी व्यक्त केला.
कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी आणि मळेवाड ग्रामपंचायत यांच्या पुढाकारातून मळेवाड कुलदेवता विद्या मंदिर शाळा क्रमांक दोन मध्ये बाल साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनामध्ये प्राथमिक शिक्षणाधिकारी धोत्रे बोलत होते.या संमेलनात ग्रंथ दिंडी देखील लहान मुलांनी सकाळी काढली त्यानंतर संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.

संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, कवयित्री उषा परब, कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी अध्यक्ष अँड संतोष सावंत, जिल्हा सचिव विठ्ठल कदम, प्रा. सुभाष गोवेकर, सरपंच मिनल पार्सेकर, उपसरपंच हेमंत मराठे,ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष अमित नाईक, ग्रामपंचायत सदस्य सानिका शेवडे, कविता शेगडे ,अर्जुन मुळीक ,महेश शिरसाट, अमोल नाईक, गिरीजा मुळीक, मधुकर जाधव ,शेजल नाईक, समृद्धी कुंभार, उपशिक्षणाधिकारी शेर्लेकर, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, महादेव देसाई, दीक्षा आडारकर ,लवू सातार्डेकर, संध्या बिबवणेकर, संगीता राळकर, जयश्री हरमलकर, नम्रता देऊळकर, शीतल वेंगुर्लेकर, संजय बांबुळकर तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेचे पदाधिकारी भरत गावडे, डॉ. दीपक तुपकर ,दिपक पटेकर,अभिमन्यू लोंढे ,राजू तावडे ,प्रतिभा चव्हाण, ऋतुजा सावंत भोसले ,प्रज्ञा मातोंडकर ,रामदास पारकर, प्रा. रुपेश पाटील,मिनल नाईक जोशी व पदाधिकारी उपस्थित होते
संमेलनाचे उद्घाटन बाल साहित्य सभेचे अध्यक्ष कुमारी वैष्णवी मुळीक यांच्या उपस्थितीमध्ये बालसाहित्य सभेचे उद्घाटक दिव्यांग कुमारी सुचिता कारूडेकर, वैष्णवी कारूडेकर, निकिता टिकस, राज्य व राष्ट्रीय खेळाडू वैष्णवी नाईक यांच्या हस्ते झाले .
यावेळी बालसाहित्य सभेचे उद्घाटक सुचिता कारूडेकर म्हणाल्या, मोबाईलच्या जमान्यांमध्ये साहित्य निर्माण करणारे बाल साहित्य संमेलन होत आहे त्याचा आनंद आहे या संमेलनातून निश्चितच साहित्य निर्मितीचा संदेश मिळेल बालसाहित्य निर्माण व्हावेत म्हणून कोकण मराठी साहित्य परिषदेचा उद्देश छान आहे.
गटविकास अधिकारी वासुदेव नाईक म्हणाले,बाल साहित्य संमेलन होत आहे त्याचा आनंद आहे. कोकण मराठी साहित्य परिषद बाल साहित्यिक निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना दिशा मिळेल. तर गटशक्षणाधिकारी कल्पना बोडके यांनी कौतुक केले. कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष अँड संतोष सावंत यांनी विद्यार्थ्यांना साहित्याविषयी कुतुहल असते त्यांच्या कलागुणांना वाव मिळाला तर उद्याचे साहित्यीक निर्माण होतील या अपेक्षेने उपक्रम हाती घेतला आहे त्याला चांगला प्रतिसाद मिळाला . शिक्षण विभागाने शाळा स्तरावर दरवर्षी साहित्य चळवळ पुढे नेण्यासाठी व मुलांमध्ये साहित्य व मराठी भाषा वाढीसाठी बाल साहित्य संमेलने घ्यावीत अशी मागणी कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेच्या माध्यमातून करीत आहोत असे स्पष्ट केले यावर प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे म्हणाले कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेने जी मागणी केली आहे ती निश्चितपणे पुढील वर्षापासून तसा क्रीडा महोत्सव याने मी होणार असे उपक्रम राबविले जातात तसेच साहित्य चळवळ पुढे नेण्यासाठी बाल साहित्य महोत्सव संमेलन घेतली जातील असे स्पष्ट केले

You cannot copy content of this page