८ जानेवारीला हिंदू राष्ट्र जागृती सभा

सिंधुदुर्ग, गोव्यातील १५ हजार हिंदू बांधव होणार सहभागी;समन्वयक हेमंत मणेरिकर यांची माहिती

बांदा/प्रतिनिधी
हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी आवश्यक हिंदूंचे प्रभावी संघटन उभे राहावे, बांधवांमध्ये जनजागृती व्हावी, त्यांना धर्म रक्षणाच्या कार्यासाठी प्रेरित करावे, हिंदू कुटुंबाना धर्मांतरातून व युवतीना लव्ह जिहाद मधून बाहेर काढण्यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने रविवार दिनांक ८ रोजी सायंकाळी ५ वाजता हिंदू राष्ट्र जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा व गोवा राज्यातून तब्बल १५ हजारांहून अधिक हिंदू बांधव सहभागी होणार असल्याची माहिती हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक हेमंत मणेरीकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
जनजागृती सभेची माहिती देण्यासाठी येथील नट वाचनालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सनातन संस्थेचे शंकर निकम, गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव जयेश थळी, इन्सुली ग्रामपंचायत सदस्य स्वागत नाटेकर, प्रगतशील काजू बागायतदार डॉ. नितीन मावळणकर, शिवराम देसाई, संदीप नाणोसकर आदी उपस्थित होते.
सभेची माहिती सर्व बांधवापर्यंत पोहोचवी यासाठी उद्या गुरुवार दिनांक ५ रोजी सकाळी १० वाजता बांदा शहरात भव्य वाहन फेरी काढण्यात येणार आहे. या सभेत सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरू स्वाती खाडये, हिंदू जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक मनोज खाडये हे वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. सभेला १५ हजारहून अधिक हिंदू बांधव सहभागी होणार असल्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी सिंधुदुर्ग व गोव्यातील प्रत्येक गावागावात प्रसार सुरु करण्यात आला आहे. विविध तरुण मंडळे, महिलांचे गट, ग्रामस्थ, हिंदुत्वनिष्ठ, लोकप्रतिनिधी यांच्या बैठकांचे सत्र सुरु असल्याची माहिती दिली.
उद्या गुरुवारी सकाळी १० वाजता श्री बांदेश्वर मंदिर येथून दुचाकी वाहन फेरीला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर जुनी व्यायामशाळा, संत सोहिरोबानाथ आंबीये मठ, उभाबाजार, मोर्येवाडा, श्री विठ्ठल मंदिर, नट वाचनालय, कट्टा कॉर्नर, गाडगेवाडी, निमजगा, गवळीटेम्ब, वाफोली मार्गे एसटी बसस्थानक, राजगुरू संकुल येथे फेरीची सांगता होणार आहे.
हिंदू धर्माच्या राक्षणासाठी, अस्तित्वासाठी व धर्म प्रसारणासाठी हजारोच्या संख्येने हिंदू बांधवांनी जनजागृती सभेत व दुचाकी फेरीत सहभागी व्हावे असे आवाहन श्री मणेरीकर यांनी केले.

You cannot copy content of this page