⚡मालवण ता.०३-: कांदळगाव येथील देव रामेश्वर देवस्थान व परिसर देवालये, विश्वस्त मंडळाची २०२१-२२ ते २०२६ – २७ पर्यंतची कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. यात अध्यक्षपदी उदय राणे यांची निवड करण्यात आली.
उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:- उपाध्यक्ष बाबुराव तातू परब, सचिव संतोष नारायण परब, उपसचिव विशाल सत्यवान राणे, खजिनदार मधुसुदन दामोदर परब, उपखजिनदार विश्राम तुकाराम राणे, विश्वस्त बाबाजी गणपत परब, विद्याधर वसंत राणे, संजय भगवान परब, विष्णू मनोहर राणे, दिनेश दीपक परब, संतोष बाळू राणे, महादेव शिवराम परब, शशिकांत’ शंकर राणे, दयानंद दत्ताराम परब, श्रेयश कृष्णा राणे, सुनील पांडुरंग घाडी, गोपाळ गुरव, सदानंद कदम, संतोष कांदळगावकर, प्रभाकर केशव कांदळगावकर.
