कर्ली येथे २२ जानेवारीपासून जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा

⚡मालवण ता.०३-: परुळे कर्ली येथील श्री देवी सातेरी ग्रामस्थ मंडळ व श्री सातेरी सांस्कृतिक कला-क्रिडा मंडळ कर्ली व समस्त कर्लीवासीयांच्या संयुक्त विद्यमाने २२ ते २६ जानेवारी या कालावधीत जिल्हा मर्यादित एक गाव एक संघ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा सातेरी कर्ली मैदान येथे खेळवली जाणार आहे.

स्पर्धेतील विजेत्या संघाला ५० हजार व उपविजेत्या संघाला २५ हजार रुपये व आकर्षक चषक, तसेच मालिकावीर व अंतिम सामन्यातील सामनावीर, फलंदाज, गोलंदाज व यष्टिरक्षकासाठी वैयक्तिक पारितोषिके देण्यात येतील. १० रोजीपर्यंत नाव नोंदणीसाठी पराग हळदणकर (९०८२१००६२३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page