भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी केली अधिकाऱ्यांशी चर्चा
सावंतवाडी ता.०२-: येथील वनविभागाच्या अंतर्गत असलेल्या चौकुळ चुरणीची मुस येथील दोन मीटरच्या रस्त्यासाठी डांबरीकरण होण्याकरिता आज ग्रामस्थांनी वनविभागाच्या कार्यालयासमोर उपोषण पुकारले आहे. दरम्यान भाजपचे जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी उपोषण स्थळी भेट देऊन ग्रामस्थांची मागणी जाणून घेत वनविभाग अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
