नववर्षाच्या पहिल्याच दिवशी युवकांकडून स्तुत्य उपक्रम
⚡सावंतवाडी ता.०२-: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसाचे औचित्य साधत असंनेिये तांबोळी मुख्य रस्त्याची युवकांकडून साफसफाई करण्यात आली.तांबोळी असंनिये मुख्य रस्ता हा दोडामार्ग ला जोडणारा पर्यायी मार्ग असल्याने या रस्त्यावर वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते मात्र रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य व रस्त्या दुतर्फा वाढलेली झाडीमुळे हा रस्ता अपघातांना आमंत्रण देत होता याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याशी वारंवार पाठपुरावा करून देखील दुर्लक्ष केल्यामुळे असंनिये गावातील स्थानिक युवकांनी एकत्र येत रत्या दुथरपा वाडलेली झाडींची साफसफाई करत साईड पट्टीची श्रम दानातून डागडुजी केली त्यामुळे ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे.
या श्रमदानात असनिये गावचे पोलीस पाटील विनायक कोलपटे, गाव विकास युवा शक्तीचे जितेंद्र सावंत, राकेश सावंत, निलेश पोकळे, आनंद ठिकार, प्रशांत ठिकार, प्रितेश ठिकार, संभाजी कोलते, सुरज कोलते, अनुप दामले, अमोल सावंत, रुपेश सावंत, शैलेश सावंत, देवेंद्र सावंत, ओमकार सावंत, , सतीश सावंत, शैलेश खाडिलकर, धोंडी सावंत, रोहित सावंत, सोहम सावंत, कृष्णा सावंत, प्रवीण सावंत विकास सावंत, वैभव सावंत आदी युवकांनी सहभाग घेतला.
