जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धांमध्ये पाटकर स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंचे यश

⚡मालवण ता.०१-: सिंधुदुर्गनगरी येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत मालवण मधील मातोश्री राखीताई पाटकर स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंनी यश प्राप्त केले आहे. यामध्ये टोपीवाला हायस्कुलच्या लीना नरेश धुरी हिने १९ वर्षाखालील वयोगटात १०० व २०० मीटर धावणे या क्रीडाप्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याने तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच कन्याशाळेच्या साईप्रसाद श्रीकांत अटक याने १७ वर्षाखालील उंचउडी स्पर्धेत १.५५ मीटर एवढी उंच उडी मारत पुढील स्पर्धेसाठी आपली निवड पक्की केली. तसेच भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुलच्या तनिष्क महेश मुळीक याने १४ वर्षाखालील ४०० मीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला. या सर्व खेळाडूंना मातोश्री राखीताई स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक ताराचंद पाटकर यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व इतरांनी अभिनंदन केले.

You cannot copy content of this page