‘सावंतवाडीत उद्या लागणार सुगरणींचा कस

पाककला स्पर्धेचे आयोजन ;उडान महोत्सवाचे निमित्त

⚡सावंतवाडी ता.३१-: नामदार दीपकभाई केसरकर मित्रमंडळ पुरस्कृत आणि रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी आयोजित उडान २०२३ महोत्सवात उद्या दिनांक १ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ५:३० वाजता पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, तांदळाच्या पिठापासून शाकाहारी आणि मांसाहारी तसेच गोड तिखट पदार्थ बनविण्याची ही स्पर्धा होणार आहे.

ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असणार असून, याचे प्रवेश शुल्क १०० रुपये ठेवण्यात आले आहे. हे पदार्थ स्पर्धकांनी आपल्या घरुन बनवून आणायचे असून, स्पर्धेच्या दिवशी वेळेत स्पर्धेच्या ठिकाणी मांडून ठेवायचे आहेत. याबाबत अधिक माहिती साठी तसेच नाव नोंदणी करण्यासाठी विनया बाड – 9421222999, एम एम जोशी -9422436859, अनघा रामाणे -7039200152 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे

You cannot copy content of this page