⚡वेंगुर्ला ता.३०-: वेंगुर्ला येथे जुगार सुरु असल्याबाबत मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार दाभोली-गळकर देवस्थान परिसरात एका चिरेबंदी इमारतीत टाकलेल्या धाडीत १७ जणांसह ३ लाख ८४ हजार ८४० रुपये किंमतीचे जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल फोन, वाहने आदी मुद्देमाल ताब्यात घेऊन वेंगुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोळंके यांच्यासह पोलीस सचिन अशोक सोनसुरकर, रामचंद्र करंगुटकर, अमित राऊळ, रामदास चव्हाण, सचिन कोयंडे या पथकाने गुरुवारी (दि.२९) सायंकाळी ४ वाजता केली.
जुगार सुरू असताना या पथकातील पोलिसांनी वेंगुर्ला तालुक्यातील बाबुराव मठकर, नरेंद्र तांडेल, महादेव भगत, संजीवन गवंडे, महेश भाईडकर, संजय नाईक , विश्वास परुळेकर, ज्ञानेश्वर कोचरेकर, ज्ञानेश्वर हुले, शंकर गावडे, यशवंत परब, सुधाकर दाभोलकर, राजन वेंगुर्लेकर, अमित वेंगुर्लेकर, बाळा राऊत, मिलिद सोनुर्लेकर, अशोक कांबळी यांना तसेच मुद्देमाल व जुगाराचे साहित्य पोलिसांनी ताब्यात घेते. अधिक तपास पोलिस दाभोलकर करीत आहेत.
जुगारावरील धाडीत १७ जण ताब्यात; तर ३ लाखांचा मुद्देमाल जप्त
