सोनुर्ली उपसरपंचपदी भाजपाचे भरत गावकर यांची बिनविरोध निवड…

एकमेव अर्ज आल्याने निवड;ग्रामस्थांकडून शुभेच्छांचा वर्षाव…

⚡सावंतवाडी ता.३०-: सोनुर्ली ग्रामपंचायतीच्या उपसंपचपदी युवा नेतृत्व असलेले भाजपाचे भरत गावकर यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंच पदासाठी सर्वानुमते भरत गावकर यांची निवड करण्यात आली होती. आज पार पडलेल्या निवडणूक कार्यक्रमात दुपारी बारा वाजेपर्यत श्री गावकर यांचाच अर्ज दाखल झाल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्याकडून त्यांची बिनविरोध घोषणा करण्यात आली. बिनविरोध निवड झाल्याबद्दल भरत गावकर सोनुर्ली ग्रामस्थांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

You cannot copy content of this page