लवकरच भजनी बुवांचा मोठा मेळावा

विशाल परब यांची घोषणा;देवगड आरेफाटा येथील गुरुदासमय आनंद सोहळा २०२२ मध्ये लावली उपस्थिती

देवगड:आजच्या जमान्यात भजनाला अत्यंत महत्व आहे.आपण ऐकत्र येतो तेव्हा समाजातील एकजूट लक्षात येते.आणी ऐकीचे दर्शन होते.अनेक बुवा आज सिंधुदुर्गात आहेत. येणारा पाच सहा महिन्यात सर्व सिंधुदुर्गातील भजनी बुवांना एकत्र करून मोठा भजनी मेळावा घेणार आहे.अशी घोषणा विशाल सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष तथा युवा उद्योजक विशाल परब यांनी केले.देवगड आरेफाटा येथील गुरुदास चौक येथे बुवा कै चंद्रकांत काशिराम कदम मार्ग येथे आयोजीत गुरूदाससमय अनंदसोहळा २०२२ कार्यक्रमात विशाल परब बोलत होते.

यावेळी बोलताना विशाल परब म्हणाले येथे प्रति पंढरपूर येथे तुम्ही निर्माण केलात.आजचा कार्यक्रम आगळावेगळा आहे.प्रकाश पारकर यांनी भजनाची ओढ जपत एक भजनाची मुहुर्तमेढ रोवली आहे.कानडे बुवा सारखे बुवा जे समाजात लोकप्रतिनिधी सारख काम करीत आहेत.असे सांगत या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page