सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे इंजिनियरिंग येथे मानवी हक्क दिन

⚡कणकवली ता.१०-: सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे कॉलेज ऑफ इंजिनियरिंग येथे मानवी हक्क दिन साजरा करण्यात आला . शाश्वत विकासाच्या मुद्द्यात मानवी हक्कांना केंद्रस्थानी ठेवण्याची आवश्यकता आहे, यावर्षी आंतरराष्ट्रीय मानवी अधिकारी दिवसाची थीम डिग्निटी, फ्रीडम अँड जस्टिस फॉर ऑल ही आहे समाजातील प्रत्येक व्यक्तीचचे स्वातंत्र अबाधित राहावे तसेच व्यक्तीला सन्मानपूर्वक जगता यावे यासाठी दहा डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लेबर लॉ अँड प्र्यकटीशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. देसाई यांना बोलवण्यात आले होते. प्रत्येकाने आपल्याशी संबंधित मानवी हक्कांचा उपयोग घेतला जात असताना इतरांच्या मानवी हक्कांची पायमल्ली होऊ नये याची दक्षता घेतली तर खऱ्या अर्थाने समाजात सुव्यवस्था निर्माण होईल असे त्यांनी विचार मांडले. समानतेचा हक्क,स्वातंत्र्याचा हक्क, न्यायप्राप्तीचा हक्क अस्पृश्यता निर्मूलन, कायद्यासमोर समानता, भेदभाव प्रतिबंध, सार्वजनिक रोजगार बाबतीत संधी या कायदेशीर बाबींवर त्यांनी प्रकाशझोत टाकला. समाजामधील आर्थिक दृष्ट्या मागास घटकांना असलेल्या शासन निर्मिती शिष्यवृत्ती प्राप्त करण्याच्या हक्क पालन करण्याबाबत त्यांनी बहुमोल मूलभूत मार्गदर्शन केले .
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिश गांगल यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे संयोजन केले .
या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. एस.टी. माने व प्रा. अरविंद कुडतरकर, विद्यार्थी व महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेची विद्यार्थी प्रतिनिधी सानिका सरदेसाई व स्वयंसेवक इंद्रगोपाल बिले यांनी केले .

You cannot copy content of this page