माजगाव प्रचाराचा भाजप, बाळासाहेबांची शिवसेनेकडून शुभारंभ

महादेव – सातेरी मंदिरात श्रीफळ ठेवत सरपंच डॉ सौ सावंत यांच्यासह सदस्य उमेदवारांच्या प्रचाराचा श्रीगणेशा

⚡सावंतवाडी ता.०९-: तालुक्यातील चुरशीची ठरत असलेल्या माजगाव ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणूक प्रचाराचा शुभारंभ भाजप व बाळासाहेबांचे शिवसेना गटाच्यावतीने आज श्री महादेव सातेरी मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला. सरपंच पदाच्या उमेदवार डाॅ. सौ अर्चना सावंत व सर्व सदस्यांच्या प्रचाराचा श्री.गणेशा यावेळी झाला.

यावेळी गांव देवस्थान कमिटी अध्यक्ष आनंद सावंत, गांव प्रमुख आर के सावंत, सतिश सावंत, तातु सावंत, जि प च्या माजी अध्यक्षा रेश्मा सावंत, बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाध्यक्ष अशोक दळवी, बाबु सावंत, मनोज नाईक, आनंद नेवगी तसेच भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page