कपडे धुण्यास गेलेल्या महिलेचा मिळाला मृतदेह

कारिवडे नदीपात्रातील घटना;मगरिने हल्ला केला संशय

⚡सावंतवाडी ता.०९-: कारिवडे येथील महिलेचा मृतदेह येथील नदी पात्रात आढळला आहे. ही महिला काल सायंकाळी कपडे धुवायला गेली असताना ती पुन्हा माघारी आली नव्हती. आज सकाळी तिचा मृतदेह काही स्थानिक नागरिकांना दिसला. त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

मगरीने हल्ला केला असावा असा, प्राथमिक अंदाज स्थानिक नागरिकांतून व्यक्त केला जात आहे. त्यानुसार वनविभागाचे कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. याबाबत ची माहिती माझी आरोग्य शिक्षण सभापती मंगेश तळवणेकर यांनी दिली

You cannot copy content of this page