सरपंचपदासह सर्व 9 सदस्य भाजपाचे बिनविरोध
⚡कणकवली ता.०७-: कणकवली तालुक्यातील वारगाव सरपंचपदी भाजपाच्या नम्रता नारायण शेट्ये यांची बिनविरोध निवड झाली आहे. केवळ सरपंचच नव्हे तर वारगाव मध्ये सर्वच्या सर्व 9 ग्रा पं सदस्य ही बिनविरोध भाजपाचे निवडून आले आहेत. बिनविरोध सदस्यपदी मानसी प्रभू, निलाक्षी हरयाण, दिलीप नावळे, कांचन जाधव, मानसी मेस्त्री, एकनाथ कोकाटे, प्रभावती पाष्टे, सुभाष धावडे,नारायण शेट्ये यांची निवड झाली आहे. आ.नितेश राणेंच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवत समस्त वारगाव वासीयांनी एकजुटीने गावच्या विकासासाठी ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात दिली आहे.
