बांदा ग्रामस्थ मंडळाची उद्या दाणोली पदयात्रा

बांदा/प्रतिनिधी
बांदा ग्रामस्थ पदयात्रा मंडळाची दुसरी पदयात्रा मंगळवार दिनांक ६ रोजी दाणोली येथे जाणार आहे. मंगळवारी पहाटे बांदा येथून श्री बांदेश्वर भुमिका दर्शन घेऊन पदयात्रेचे प्रस्थान होईल. दाणोली येथे श्री समर्थ सद्गुरु श्री साटम महाराज समाधी दर्शन घेऊन प्रतिवर्षाप्रमाणे भजन करण्यात येणार आहे. पदयात्रींनी अधिक माहितीसाठी पदयात्रा मंडऴ अध्यक्ष उमेश मयेकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page