बांदा/प्रतिनिधी
श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट संचलित मडुरा येथील व्ही. एन. नाबर इंग्लिश मीडियम प्रशालेत वार्षिक पालक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पालकांनी विविध क्रीडा प्रकारात सहभाग घेत पारितोषिके मिळविली.
या कार्यक्रमासाठी बांदा नाबर शाळेच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई, उपमुख्याध्यापिका शिल्पा कुबडे, पालक सदस्य सौ अदिती वालावलकर आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्याध्यापिका सौ. प्रतीक्षा शिरोडकर यांनी प्रमुख पाहुणे व सर्व समिती सदस्य यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून मुख्याध्यापिका सौ. शिरोडकर यांनी क्रीडा क्षेत्राचा आढावा सादर केला व त्याचबरोबर खेळांचे महत्त्व सांगून मार्गदर्शन केले.
मान्यवरांच्या हस्ते पालक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन झाले. पूर्व प्राथमिक व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी रेबन व डंबेल्स व्यायाम व पॅरामिड सादर केले. यावेळी मनाली देसाई यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले. आजच्या दिनचर्येत खेळ का खेळावे याचे देखील महत्त्व सांगितले. त्यानंतर सर्व पालक रेल्वे रेस बुक, बॅलन्सिंग पोटॅटो रेस व संगीत खुर्ची यासारखे खेळ झाले. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. शिरोडकर सहशिक्षिका वेलंकनी रोड्रिक्स, प्राची परब, तेजस्वी गावडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची परब यांनी केले तर आभार तेजस्वी गावडे यांनी मानले.
फोटो :-
मडुरा नाबर प्रशालेत पालक क्रीडा महोत्सवाचे उदघाट्न करताना मनाली देसाई. सोबत शिल्पा कुबडे, प्रतीक्षा शिरोडकर व इतर. (छायाचित्र – निलेश मोरजकर)
व्ही एन नाबर इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये वार्षिक महोत्सव उत्साहात
