⚡मालवण ता.०४-:
हुतात्मा अपंग बहुद्देशीय विकास कल्याणकारी संस्था, ओगलेवाडी-कराड व श्री स्वामी समर्थ सेवेकरी मंडळ, राठिवडे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अपंग दिनानिमित्त १२ ते १५ डिसेंबरपर्यंत स्वामी समर्थ मठ राठिवडे मालवण येथे पाचव्या राज्यस्तरीय दिव्यांगाचे साहसी सहल शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरास उपस्थित राहून दिव्यांगाचे मनोधैर्य वाढवावे, अधिक माहितीसाठी (९४२०८२३३७९) क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
राठिवडे येथे राज्यस्तरीय दिव्यांग साहसी शिबीर
