सिनियर बिडिए कार कार्तिक रावल
⚡दोडामार्ग ता.०४-: मिरा क्लिनफ्युल्स, दोडामार्ग बायोफ्युल्स आणि दोडामार्ग क्लिनफ्युल्स प्रा. लि. या तिन्ही कंपन्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी काम करत नसून देशातील शेतकरी व नागरिकांसाठी काम करत आहे. त्यामुळे कंपनीचा मुख्य उद्देश देशाच्या निसर्गाचे रक्षण करणे हा आहे असे प्रतिपादन मिरा क्लिनफ्युल्स लि. कंपनीचे सिनियर बिडीए कार्तिक रावल यांनी केले.
मिरा क्लिनफ्युल्स लि. व दोडामार्ग बायोफ्युल्स प्रोड्युसर कंपनी लि. आणि दोडामार्ग क्लिनफ्युल्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने कंपनीच्या एमकोल ( बायोकोल ) युनिटच्या दोडामार्ग सासोली येथील भूमिपूजनाच्या सोहळ्याप्रसंगी श्री. रावल बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर हरिहर मयेकर, विद्या मयेकर, एमसीएल कंपनीचे सिनियर प्राईम बिडीए श्रीकांत करजावकर, सागर सांगेलकर, रामा सटजी, कुडाळ एमपीओ प्रशांत भालेराव, कणकवली एमपीओ दिगंबर रासम, देवगड एमपीओ राजेंद्र काडगे वेंगुर्ला एमपीओ वैभव उगवेकर, बिडीए स्वप्नील तेजम, पोलीस पाटील संजय गवस आदीसह कंपनीचे सर्व संचालक, सहकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी श्री. रावल पुढे म्हणाले, कंपनीचे एमसीएनजीचे एक युनिट झरेबांबर व एमकोलचे एक युनिट सासोली येथे उभारण्यात येत असुन तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाचा आर्थिक विकास व्हावा, ग्रामीण युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, सेंद्रिय शेतीला प्राधान्य मिळावे हा कंपनीचा उद्देश आहे. तसेच येत्या तीन महिन्यात ही कंपनी उभी होऊन उत्पादनही निर्माण करण्यात येणार असून त्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
[ प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सुमारे 2 हजार 500 जणांना रोजगार – हरिहर मयेकर ]
यावेळी कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर हरिहर मयेकर यांनी या कंपनीपासून प्रत्यक्ष 500 जणांना व अप्रत्यक्षपणे 2 हजार लोकांना रोजगार प्राप्त होणार असल्याचे सांगून या कंपनीमुळे दोडामार्ग तालुक्यातील नोकरी धंद्यानिमित्त होणारे स्थलांतरही थांबण्यास मोठी मदत होणार असल्याचे सांगितले. यावेळी या कंपनीचे एमकोल ( बायकोल) हे युनिट उभे राहावे यासाठी राम सटजी यांनी आपली दोन एकर जमीन दिली त्यांचा कंपनीतर्फे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश गवस यांनी केले तर आभार हरिहर मयेकर यांनी मानले.
