मळगाव येथील दत्तमंदिरात ७ डिसेंबर रोजी दत्त जयंती उत्सव

⚡सावंतवाडी ता.०३सहदेव राऊळ-: मळगाव रस्तावाडा येथील स्वयंभु औदुंबर दत्तमंदिर येथे ७ डिसेंबर रोजी दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे आहे.
यनिमित्त सायंकाळी ४.०० वाजता दत्त प्रासादिक भजन मंडळाचे भजन, ५.३० वाजता ह. भ. प. शेखर पाडगावकर यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे.

कीर्तनाला सुनील पाडगावकर, गजानन मेस्त्री, प्रसन्न जोशी आदी साथसंगत करणार आहेत. त्यानंतर दत्तजन्म सोहळा होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन खानोलकर कुटुंबिय मळगाव व श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ मळगाव रस्तावाडा यांनी केले आहे

You cannot copy content of this page