⚡कणकवली ता.०१-: १ डिसेंबर हा दिवस जगभरामध्ये जागतिक एड्स दिन म्हणून साजरा करण्यात येतो. एड्सचा प्रसार थांबावा , बाधित व्यक्तींना समाजामध्ये चांगली वागणूक मिळावी व एड्स रुग्णांची संख्या शून्य व्हावी या उद्देशाने हा दिन साजरा करण्यात येतो. कणकवली कॉलेज, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, रेड रिबीन क्लब , सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, उपजिल्हा रुग्णालय कणकवली आणि जिल्हा निधी प्राधिकरण, कणकवली यांचे संयुक्त विद्यमाने एड्स जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले होते.
अभियान अंतर्गत महाविद्यालय परिसरामधील सर्व नागरिकांना लाल फीत बांधून समाजामधील एड्सग्रस्त व्यक्तींना चांगली वागणूक द्यावी, एड्स पासून कसे सुरक्षित राहावे, एड्स चे शून्य रुग्ण उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी नागरिकांच्या भूमिका काय आहेत याबाबत संदेश देण्यात आला. त्यानंतर शिक्षण प्रसारक मंडळ, कणकवली चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले, डॉ.संदीप साळुंखे, यांच्या उपस्थितीमध्ये जनजागृती फेरीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात झाली. फेरीमध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सूक्ष्मजीवशास्त्र विभाग मधील स्वयंसेवक व विद्यार्थी पांढरा शुभ्र पोशाख आणि लाल फीत लावून सहभागी झाले. कणकवली शहरांमध्ये एड्स जनजागृती संदर्भात विविध घोषणा देत जनजागृती करण्यात आली. स्वयंसेवक सिद्धी पालव, माधवी चव्हाण, ऊर्वी मालंडकर, श्रुती वालावलकर, वैष्णवी परब, समिधा सावंत, तृप्ती मिस्त्री, साक्षी तांबे, सानिका कासले आणि श्रेयस कांबळे यांनी एड्स जनजागृतीसाठी पथनाट्य सादर केले. सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील विद्यार्थी प्रथमेश घाडीगावकर, दीक्षांत पेडणेकर ,कस्तुरी पाताडे व इतर यांनी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यामध्ये पोस्टर स्पर्धा, मॉडेल स्पर्धा, एड्स जनजागृती या विषयावर आधारित सापशिडी, या स्पर्धेमध्ये विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. या सर्व जनजागृती मोहिमेचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी सुरेश पाटील, सागर गावडे , विनया रासम, आदिती मालपेकर, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग मधील गीतांजली सापळे, पल्लवी गोखले व अरविंद उमरीकर यांनी प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले यांचे मार्गदर्शनाखाली केले. यामध्ये महाविद्यालयामधील शंभरहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.
