आम.नितेश राणेंचा सत्कार
⚡कणकवली ता.२२-: कणकवली तालुक्यातील नांदगाव महापुरुष सेवा संघाच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
कणकवली विधान सभा मतदार संघाचे आम. नितेश राणे यांनी या हरीनाम सप्ताहला सदिच्छा भेट देऊन श्री महापुरूषाचे दर्शन घेतले . महापुरुष सेवा संघातर्फे त्यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी महापुरुष सेवा संघाचे मुंबई मंडळ अध्यक्ष सुरेश पाटील , पंढरी वायंगणकर, माजी सरपंच संजय पाटील,भाई मोरजकर, नांदगाव महापुरुष सेवा संघाचे अध्यक्ष शशिकांत शेटये, वसंत कांदळकर, आप्पा म्हसकर, हनुमंत वाळके,
महादेव म्हसकर , शिवशंकर शेटये , विठोबा कांदळकर, मंगेश बोभाटे, कमलेश पाटील, राजू खोत आदी उपस्थित होते.
