शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी उद्या गवळी तिठा येथे आत्मक्लेष आंदोलन

सामाजिक कार्यकर्ते अण्णा उर्फ वसंत केसरकर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपचे प्रवक्ते त्रिवेदी यांनी केले वादग्रस्त वक्तव्य

⚡सावंतवाडी ता.२१-: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपचे प्रवक्ते त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केल्या बदल त्याचा निषेध करण्यासाठी आत्मक्लेष आंदोलन गवळी तिठा येथे उद्या करणार असल्याची माहिती जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा उर्फ वसंत केसरकर यांनी आज येथे दिली. दरम्यान शिवाजी महाराजांबद्दल आदर असणाऱ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन अण्णा केसरकर यांनी केले.

You cannot copy content of this page