पाडलोसमध्ये विद्युत वाहिन्यांवर झाड कोसळले

अपघाताची शक्यता : प्रशासनाने दखल घेण्याची मागणी

⚡बांदा ता.२१-: बांदा-शिरोडा मार्गावरील पाडलोस स्मशानभूमीजवळ असलेल्या स्ट्रीट लाईटच्या विद्युत वाहिन्यांवर जीर्ण झाड कोसळले आहे. अपघात टाळण्यासाठी महावितरण विभागाने याकडे लक्ष देऊन धोकादायक झाड त्वरित हटवावे व विद्युत वाहिन्या निर्धोक कराव्या अशी मागणी प्रवासी तसेच नागरिकांमधून होत आहे.
पाडलोस स्मशानभूमी जवळील स्ट्रीट लाईटवर जीर्ण झाड कोसळून अनेक दिवस झाले. परंतु याकडे मात्र महावितरणचे लक्ष गेले नाही. विद्युत वाहिन्यांवर झाड आल्यामुळे वाहिन्या बांदा-शिरोडा रस्त्यावरील येजा करणाऱ्या वाहन चालकांवर पडू शकतात. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाने याकडे तात्काळ लक्ष देऊन धोकादायक झाड त्वरित हटवावे अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

You cannot copy content of this page