माजगावत विक्रांत सावंत यांना धक्का

ठाकरे गटाचे ग्रा प सदस्य रिचर्ड डिमेलो भाजपात;संजू परब यांच्या उपस्थितीत केले पक्षांतर

⚡सावंतवाडी ता.२०-: आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्वव ठाकरे गटाचे माजगांव ग्रा. पं सदस्य रिचर्ड डिमेलो यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांसह सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला.त्याच्या या प्रवेशामुळे उद्धव ठाकरे गटासह विक्रांत सावंत यांना धक्का बसला.

तसेच केवईन फर्नांडिस यांनी उद्धव गट शिवसेना मधुन भाजपात प्रवेश केला.यावेळी मनोज नाईक, सचिन बिर्जे ,विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, तथा शक्तिकेंद्र प्रमुख बाळा वेजरे, सुधिर वारंग,अजय सावंत, सरपंच संघटना जिल्हा उपाध्यक्ष विनोद राऊळ ,आनंद नेवगि ,दिलिप भालेकर,बांदा सरपंच अक्रम खान, ऐड.अनिल निरवडेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page