कुस्ती स्पर्धेत कट्टा वराडकर हायस्कूलचे यश

⚡मालवण ता.२०-: मालवण येथील जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल येथे झालेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत ४५ किलो वजनी गटात कट्टा येथील वराडकर हायस्कूलच्या अनिरुद्ध किसन हडलगेकर (नववी) व ५३ किलो वजनी गटात संकल्प संजय पेंडुरकर (नववी) तसेच ६५ किलो वजनी गटात दर्पण भालचंद्र भोजने (अकरावी) व ७९ किलो वजनी गटात ओमकार नंदकिशोर वाईरकर (बारावी) या खेळाडूंनी फ्री स्टाईल प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला.

या खेळाडूंची वेंगुर्ले येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page