कणकवलीत उदया रंगणार एक दिवस छोट्यांसाठी

समीर नलावडे मित्रमंडळाच्या उपक्रम; खाऊगल्ली व विविध कार्यक्रम

⚡कणकवली ता.१९-: कणकवली येथील चौंडेश्वरी मंदिरानजीक गणपती साना येथे येत्या 20 नोव्हेंबर रोजी
एक छोट्या मुलांसाठी एक दिवस छोट्यांसाठी, खाऊ गल्ली उपक्रमाचे आयोजन समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. 20 नोव्हेंबर रोजी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते सायंकाळी 5 वाजता या उपक्रमाचे उद्घाटन केले जाणार आहे.
मुंबईत येथील गायक सौरभ दफ्तरदार, तृप्ती दामले यांची गाण्याच्या मैफिलचा नजराणा पेश केला जाणार आहे . कॉमेडी कम अँकर विजय नायर हे देखील या निमित्ताने उपस्थित असणार आहेत. बोलक्या बाहुल्या व जादूगार लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवणाऱ्या सुचित्रा कुमार यांचे देखील जादूचे प्रयोग व बोलक्या बाहुल्यांचा कार्यक्रम होणार आहे. लहान मुलांना आकर्षण असणारे वेगवेगळ्या प्रकारचे कार्टून या ठिकाणी असणार आहेत. या ठिकाणी सेल्फी पॉईंट देखील केला जाणार आहे. लहान मुलांना मज्जा मस्ती करता यावी , थोडा विरंगुळा मिळावा या उद्देशाने खाऊ गल्ली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.खाऊ गल्लीमध्ये येणाऱ्या सर्व मुलांना खाऊ साठी 50 रुपयांचे कुपन दिले जाणार आहे. तसेच या वेळी विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल मोफत लावण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सेल्फी पॉईंट, झोपाळे, पाळणी, अनेक खेळणी देखील या ठिकाणी असणार आहेत. स्थानिकांना, बचतगटाना स्टॉल साठी प्राधान्य देण्यात येणार देणार आहे. यासाठी 8×10 ची जागा देणार असून, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असणार आहे. या खाऊ गल्ली मध्ये पिझा, पाणीपुररी, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स, शोरमा, चायनीज, असे अनेक स्टॉल असणार आहेत. आतापर्यंत या ठिकाणी स्टॉल साठी उस्फुर्त पणे जागा बुक केल्या असून, जवळपास 50 हून अधिक स्टॉल या ठिकाणी लागणार आहेत. गणपती साना येथील आतील भागामध्ये सेल्फी पॉईंट, मुख्य कार्यक्रम व लोकांना बैठक व्यवस्था असणार आहे. तर बाहेरील भागात मिकी माऊस व अन्य खेळाचे साहित्य असणार आहे. यासह अन्य अनेक कार्यक्रमांची मेजवानी या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page