सावंतवाडीत शिंदे गटा कडून बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी साजरी

⚡सावंतवाडी ता.१७-: सत्ता संघर्षानंतर प्रथमच हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी बाळासाहेबाची शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी साजरी केली.सावंतवाडी येथील शालेय शिक्षण मंत्री नामदार दीपक केसरकर यांच्या श्रीधर आपारमेंट संपर्क कार्यालयात झालेल्या बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अर्ध पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

यावेळी माजी नगरसेविका भारती मोरे शुभांगी सुकी स्वप्ना नाटेकर सायली होडावडेकर लतिका सिंग गीता सुकी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश बिद्रे माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर पूजा नाईक सुवर्णा गाड गजानन नाटेकर विश्वास घाग आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आणि स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला इतर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फुले अर्पण करून आदरांजली वाहिली.

You cannot copy content of this page