.. आणि आम.नितेश राणे अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले

⚡कणकवली ता.१७-: आपदग्रस्तांच्या मदतीसाठी आपण नेहमीच तत्पर असतो याची प्रचिती आम. नितेश राणे यांनी दाखवून दिली.आमदार नितेश राणे बुधवारी रात्री देवगडवरून येत असताना रस्ते अपघातात जखमीला मदत करून आदर्श वस्तुपाठ घालून दिला.

आमदार नितेश राणे हे बुधवारी रात्री 11 वाजता देवगडवरून कणकवलीकडे येत असताना नांदगाव तिठा येथे मोटर सायकल अपघातात जखमी झालेल्या आणि मदतीच्या प्रतिक्षेत असलेल्या तरुणाला आपल्या गाड्या थांबवून स्वतः खाली उतरून आमदार नितेश राणे यांनी मदत केली. अपघातग्रस्त तरुणाला आपल्या ताफ्यातील गाडीतून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
अपघातग्रस्तांना मदत करा असे आवाहन शासन आणि प्रशासनाच्यावतीने सातत्याने करण्यात येते. आमदार नितेश राणे यांनी एका अपघातग्रस्ताला मदत करून एक आदर्श उदाहरण घालून दिले.

You cannot copy content of this page