⚡वेंगुर्ला ता.१६-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा परिषद व क्रिडा अधिकारी, सिधुदुर्ग द्वारा आयोजित वेंगुर्ला तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा १४ नोव्हेंबर रोजी पार पडली. यात सिधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूलचा इयत्ता दहावीमधील विद्यार्थी कु. चिन्मय युवराज मराठे याने प्रथम क्रमांक पटकाविला असून त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद शेख, संचालक प्रशांत नेरुरकर, सेक्रेटरी दत्तात्रय परुळेकर, मुख्याध्यापिका मनिषा डिसोजा तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
फोटोओळी – बुद्धिबळ स्पर्धेत यश मिळविणा-या चिन्मय मराठे याचे शाळेतर्फे अभिनंदन करण्यात आले.
बुद्धिबळ स्पर्धेत चिन्मय मराठेचे यश
