⚡वेंगुर्ला ता.१६-: महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची जिल्हास्तरीय बैठक ओरोस येथे राजेंद्र माणगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत वेंगुर्ला हायस्कूलच्या सहाय्यक शिक्षिका सुरेखा विश्वास शिदे यांची शिक्षक परिषदेच्या जिल्हा आघाडी प्रमुखपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी शिक्षक परिषदेचे ज्येष्ठ नेते वेणूनाथ कडू, जिल्हा सचिव सलिम तकिलदार, वाय.पी.नाईक, एस.एम.सांगडे, नंद घोगळे, एन.पी. माणकर, भरत केसरकर आदी उपस्थितीत होते. शिदे यांच्या निवडीबद्दल वेंगुर्ला हायस्कूलमध्ये त्यांचा १४ नोव्हेंबर रोजी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक पी.डी.कांबळे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
