सिंधुदुर्ग गोवा बॉर्डरवर स्वातंत्र्य रायडर् बाईकर रॅलीचा शुभारंभ

जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांची उपस्थिती

⚡बांदा ता.१५-: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या वतीने फिट इंडिया अंतर्गत ऑल इंडिया मोटारसायकल मोहिमेच्या सहकार्याने
आयोजित ‘स्वातंत्र्य रायडर बाईकर रॅलीचे’ आज सकाळी सिंधुदुर्ग-गोवा सीमेवर बांदा येथे जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

या रॅलीत ७५ बाईकस्वार सहभागी असून ही रॅली संपूर्ण भारतभर भ्रमण करणार आहे. या रॅलीतून पूर्ण भारतात भारताचा सांस्कृतिक वारसा, शारीरिक स्वास्थ याबाबत प्रचार करण्यात येणार आहे. आज या रॅलीचे गोव्यातून महाराष्ट्र राज्यात जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर स्वागत करण्यात आले. ही रॅली १५ ते १७ नोव्हेंबर या कालावधीत महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रायगड, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर व पालघर जिल्ह्यातून प्रवास करणार आहे.
आज सकाळी ९ वाजता रॅलीचे बांदा येथे मुंबई गोवा महामार्गावर जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी आरोग्य व पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. स्वागत कार्यक्रमानंतर ही रॅली आंबोली आजरा मार्गे कोल्हापूर येथे रवाना झाली.
फोटो :-
बांदा येथे बाईकर्स रॅलीचे स्वागत करताना जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस. (छायाचित्र – निलेश मोरजकर)

You cannot copy content of this page