कणकवली खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी दोन दिवसात उमेदवारी अर्ज दाखल होणार

⚡कणकवली ता.१५-: कणकवली तालुका खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुक 14 डिसेंबरला होत असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर आहे मात्र आजपर्यंत एकही अर्ज दाखल करण्यात आला नाही. एकूण 15 जागांसाठी ही निवडणूक होत आहे.
मात्र गेल्या दोन दिवसात या खरेदी विक्री संघासाठी एकाही उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला नाही शेवटच्या दोन दिवसात अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी होण्याची शक्यता आहे
कणकवली तालुका खरेदी विक्री संघ मर्यादित कणकवली येथे भाजपा पुरस्कृत सत्ता आहे,मागील निवडणूक बिनविरोध झाली आहे.त्यामुळे बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम राहणार काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.या निवडणुकीत भाजपा,बाळासाहेबांची शिवसेना युती विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे, महाविकास आघाडी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले विठ्ठल देसाई यांनी गेली सात वर्षे संघाचा कारभार सांभाळला आहे. त्यामुळे पुन्हा भाजप पुरस्कृत पॅनल या निवडणुकीत आपले वर्चस्व राखण्याचे प्रयत्न करणार आहे

या निवडणुकीसाठी ११ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आता जाहीर झालेल्या निवडणुकीनुसार ११ ते १७ नोव्हेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. उमेदवारी अर्जांची छाननी १८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २१ नोव्हेंबर आहे. तर निशाणी वाटप व उमेदवारांची यादी ६ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून आवश्यकता असल्यास १४ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ यावेळेत मतदान होणार आहे.

तालुका खरेदी विक्री संघाची ही निवडणूक एकूण १५ जागांसाठी होत आहे. यात प्राथमिक शेती संस्था मतदारसंघातून सात सभासद निवडून द्यावयाचे आहेत. त्यासाठी ३७ संस्था मतदार आहेत. इतर संस्थांच्या माध्यमातून एका सभासदाची निवड करावयाची असून त्यासाठी १९ संस्था आहेत. तर व्यक्ती मतदारसंघातून दोन सभासद निवडायचे आहेत. अनु. जाती, जमातीमधून एक, महिला दोन, इतर मागास प्रवर्ग एक व विमुक्त जाती, भटक्या जमाती एक अशा सात सभासदांच्या निवडीसाठी ८२१ मतदार मतदान करणार आहेत. १५ जागांसाठी १४ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

You cannot copy content of this page