परशुराम उपरकर यांचा सवाल; सत्ता असताना आंदोलन हे दुर्दैव
⚡कणकवली ता.१५-: आमदार नितेश राणे यांना केवळ देवगड व जामसंडे या दोन गावातीलच अवैध धंदे दिसतात.त्यांच्या मतदारसंघातील अन्य दोन तालुक्यांतील अवैध धंदे दिसत नाहीत का ? असा परखड सवाल मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी व्यक्त केला. गृहमंत्री, पालकमंत्री स्वतःच्या पक्षाचे असूनही राज्यातील सत्ताधारी पक्षाचे आमदार असलेल्या आमदार नितेश राणेंना अवैध धंद्यांमुळे पोलीसांविरोधात आंदोलन करण्याची भाषा करावी लागते हे शोभत नाही अशी टीकाही उपरकर यांनी
कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी आमदार नितेश राणे यांच्यावर टीका केली.
परशुराम उपरकर म्हणाले,नूतन पोलिस अधिक्षक अग्रवाल यांची मनसे शिष्टमंडळाने भेट घेत जिल्ह्यातील अंमली पदार्थ तसेच अवैध धंद्याबाबत कारवाई करण्यासाठी निवेदन दिले आहे. मात्र आमदार नितेश राणे हे केवळ देवगड आणि जामसंडे या भागाकडे लक्ष देत आहेत त्यांच्या मतदारसंघात तीन तालुके येतात हे त्यांनी ध्यानी घ्यावे असे सांगताना उपरकर म्हणाले,कणकवली तालुक्यातील ज्या माजी सरपंचाची गाडी अवैध दारू नेताना आज पकडली गेली तो कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता आहे ? गृहमंत्री, पालकमंत्री स्वतःच्या पक्षाचे असूनही राज्यातील सत्ताधारी पक्षाचे आमदार असलेल्या आमदार नितेश राणेंना अवैध धंद्यांमुळे पोलीसांविरोधात आंदोलन करण्याची भाषा शोभत नाही अशी टीकाही उपरकर यांनी केली.दारू, मटका आणि अंमली पदार्थांमुळे अनेक तरुणांनी जिल्ह्यात आत्महत्या केल्या आहेत. जिल्ह्यात अंमली पदार्थ तसेच अवैध धंद्यात कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते असले तरीही युवा पिढी बरबाद करणाऱ्या या बेकायदेशीर धंद्यांना कोणत्याही राजकीय पदाधिकाऱ्यांनी पाठीशी घालू नये असे आवाहन उपरकर यांनी करताना अवैध धंदे बंद होण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकत्र येण्याची गरज आहे असेही ते म्हणाले. तरुणांच्या हाताला काम नाही म्हणून अशा अवैध धंद्याकडे तरुण पिढी वळत आहे असे म्हटले जात असेल तर या लोकप्रतिनिधीने तरुणांना नोकऱ्या आणि रोजगाराचे साधन उपलब्ध करून द्यावे मग तरुण पिढी बरबादीकडे वळणार नाही असे सांगतानाच परशुराम उपरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध धंदे बंद झालेच पाहिजेत ही मनसेची मागणी असून त्यासाठी लढा देण्याची ही आमची तयारी असल्याचे उपरकर म्हणाले.
