नांदगाव सरपंच ओबीसी साठी राखीव
⚡कणकवली ता.१५-: या आठवड्यात सर्व ठिकाणी ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून 28 नोव्हेंबर पासून अर्ज भरणार आहेत.
कणकवली तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत निवडणूक ही कार्यक्रम जाहीर झाला असून सदर निवडणूक शांततेत पार पडणेकरिता तसेच त्याबाबत सादक बादक चर्चा व ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या अनुषंगाने नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर यांनी आज बुधवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ठिक 6 वा. नांदगाव ग्रामपंचायत सभागृहात सभा आयोजित केली आहे. तरी सर्व मतदार ग्रामस्थ यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत निवडणुक साठी खालील प्रमाणे आरक्षण आहे. नांदगाव सरपंच ओबीसी साठी राखीव झाले आहे. तर प्रभाग निहाय आरक्षण –
प्रभाग क्रमांक 1 -पावाची वाडी, पाटील वाडी , हरिजन वाडी मधली वाडी मोरये वाडी आरक्षण –
सर्वसाधारण स्त्री राखीव 1, सर्वसाधारण 2 , / प्रभाग क्रमांक 2 ) वाघाची वाडी ,पाटवणे वाडी आरक्षण – अनुसूचित जाती 1, सर्व सर्वसाधारण राखीव स्त्री 2 / प्रभाग क्रमांक 3 – नांदगाव तिठा
सर्वसाधारण राखीव स्त्री 1, सर्व साधारण 1/ प्रभाग क्रमांक 4 -खालची मुस्लिम वाडी, बिडयेवाडी ,सिसयेवाडी ,वाशिन वाडी – आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव 1, सर्वसाधारण स्त्री राखीव 1, सर्वसाधारण 1
