⚡मालवण ता.१४-: प्रतिवर्षी साजऱ्या होणाऱ्या पक्षी सप्ताहानिमित्त रानमित्र टुरिझम आचरा तर्फे मालवण व देवगड तालुका मर्यादित शाळा स्तरावर निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता कै. बाळकृष्ण ना. बिडये विद्यालय केंद्रशाळा आचरे नं. १ येथे होणार आहेत. स्पर्धेसाठी २० नोव्हेंबर पूर्वी स्पर्धकांनी नावनोंदणी करणे आवश्यक आहे.
यामध्ये निबंध स्पर्धा- लहान गट – इयत्ता पहिली ते सातवी, विषय – माझा आवडता पक्षी, मोठा गट- आठवी ते बारावी, विषय- निसर्ग संवर्धन काळाची गरज हा विषय असणार आहे. या स्पर्धेत प्रथम संपर्क करणाऱ्या २० स्पर्धकांना प्राधान्य दिले जाणार असून एका गटासाठी एकाच शाळेतील जास्तीत जास्त २ स्पर्धक सहभागी होऊ शकतील. स्वप्निल गोसावी ७७९८०४०४०२ यांच्याकडे नावनोंदणी करावी. वक्तृत्व स्पर्धा- लहान गट – पहिली ते सातवी, विषय- साप: शत्रू नव्हे मित्र, मोठा गट – आठवी ते बारावी विषय:- निसर्ग, मानव सखे सोबती. या स्पर्धेसाठी दोन्ही गटात प्रत्येकी१० स्पर्धकांना प्रवेश असून एका गटासाठी एकाच शाळेतील १ स्पर्धक सहभागी होऊ शकेल. डॉ. श्रीकृष्ण मगदूम ७३७८५४४७२२ यांच्याकडे नावनोंदणी करावी. चित्रकला स्पर्धा- पहिली ते सातवी- विषय- पक्षी व त्यांची अधिवास, माझा आवडता पक्षी माझ्या अंगणात येणारा पक्षी. या स्पर्धेत ३० स्पर्धकांना प्रवेश दिला जाणार असून एका शाळेतील जास्तीत जास्त ३ स्पर्धक सहभागी होऊ शकतील. नावनोंदणीसाठी विशाल गोलतकर ९८२०५८५९६९ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
