⚡सावंतवाडी ता.१४सहदेव राऊळ- : राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत मळगाव इंग्लिश स्कूल मळगावची इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेणारी कु. वेदा दत्तगुरु कांबळी हिने राज्यस्तरीय बालचित्रकार पुरस्कार प्राप्त केला.
शिक्षक ध्येयतर्फे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा २०२२ साठी राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सुंदर सुबक चित्र काढणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या कलेला उत्तेजन देणे,त्यांची सुप्त कला राज्यातील इतर विद्यार्थ्यांपर्यंत आणणे, त्यांचे कौतुक करून प्रोत्साहन देऊन, त्यांच्यातील सुप्त कलाकार वृत्ती वाढीस लावणे हाच मुख्य हेतू या स्पर्धेमागचा होता. ही स्पर्धा पहिली ते पाचवी व सहावी ते दहावी अशा दोन गटात घेण्यात आली. या स्पर्धेला राज्यातून मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत मळगाव हायस्कूलची इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेणारी कु. वेदा दत्तगुरु कांबळी हिने या स्पर्धेत भाग घेऊन राज्यस्तरीय बालचित्रकार पुरस्कार मिळविला. वेदा हिने बऱ्याच स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून स्पर्धेमध्ये यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव(ता. चांदवड) चे कला शिक्षक देविदास हिरे व सोलापूर जिल्ह्यातील सोड्डी जिल्हा परिषद शिक्षक अमित भोरकडे यांनी केले.
