मालवण ‘स्वरसागर’ ऑर्केस्ट्रास उत्स्फूर्त प्रतिसाद

मनसेचे मालवण शहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर यांच्यावतीने आयोजन

⚡मालवण ता.१४-: मनसेचे राज्य सरचिटणीस परशुराम ऊर्फ जीजी उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचे मालवण शहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर यांच्या वतीने मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात आयोजित केलेल्या स्वरसागर या ऑर्केस्ट्रा कार्यक्रमास रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमात सागर कांबळी यांच्या स्वरसागर या ऑर्केस्ट्राचे सादरीकरण झाले. याचे निर्माते बाळा कांबळी, संगीत संयोजक सागर कांबळी आणि मुंबई जोगेश्वरीचे नामवंत कलावंत यांचा समावेश होता. यावेळी हिंदी व मराठीतील सदाबहार गीतांचे सादरीकरण होऊन या विशेष गीत संगीत रजनीने मालवणच्या रसिकांना मंत्रमुग्ध केले.

मनसेचे तालुका संपर्क प्रमुख राजू साटम यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास मनसेचे उत्तर मुंबई लोकसभा वाहतूक सेना उपाध्यक्ष सुरेश चौरसिया, मुंबईतील मनसे पदाधिकारी नागेश आपटे, मालाड विधानसभा शाखाध्यक्ष राजेंद्र नंदनवार, मनसे तालुका सचिव विल्सन गिरकर, शहरअध्यक्ष विशाल ओटवणेकर, मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपुरकर, महिला शहराध्यक्ष सौ. भारती वाघ मनविसे तालुकाध्यक्ष संदीप लाड आदी उपस्थित होते.

मालवण उप तालुकाध्यक्ष उदय गावडे, मनविसे शहर अध्यक्ष वैभव माणगांवकर, संकेत वाईरकर, मनसे उपशहर अध्यक्ष गुरू तोडणकर तसेच तालुक्यातील व शहरातील सर्व मनसे, मनविसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतल्याचे विशाल ओटवणेकर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page