शहरातील रस्त्यांची डागडुजी सुरू…

वाहन चालकांत समाधान..

⚡सावंतवाडी ता.१४-: सावंतवाडी नगरपालिका प्रशासनाकडून आज रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची डांगडुजी करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, वाहन चालकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान शहरात अनेक ठिकाणी खड्डे पडले होते तसेच अपघाताची देखील शक्यता नाकारता येत नव्हती. यावेळी वाहन चालकांनी वारंवार खड्डे बुजवण्याची मागणी केली होती अखेर नगरपालिका प्रशासन दाखल घेऊन डांगडुजी काम सुरू केल्याने वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले.

You cannot copy content of this page